E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानातील ड्रोन हल्ल्यात कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
21 May 2025
सुरक्षा दल, दहशतवाद्यांच्या संघर्षाचा फटका
पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील ड्रोन हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी लष्कराने दहशवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन डागले होते. मात्र, नेम चुकून ते नागरी वस्तीवर पडले. त्यामुळे चार मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आंदोलन केले.
उत्तर वझिरीस्थानातील मीर अली परिसरात सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक उडाली. एका ड्रोनने हुमजा गावातील एका घरावर बाँब टाकला. स्फोटात एकाच कुटुंबातील चार मुले ठार झाली असून पाच जण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली होती. स्थानिक नागरिकांनी मीर अली चौकात धरणे आंदोलन केले. दोषींना शिक्षा द्यावी आणि नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी करणारे फलकही त्यांनी फडकावले. तसच ड्रोन हल्ल्याचा निषेध देत घोषणा दिल्या. सुरक्षा दल आणि बंदी घातलेली तेहरीक ए तालिबान पाकिस्तान दहशतवादी संघटना ड्रोनचा वापर एकमेकांवर करत आहेत. त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.
खैबर पख्तुनख्वा प्रांताचे पुनर्वसन मंत्री हाजा नके महमद डवार यांनी घटनेची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. नागरिकांना संघर्षाची झळ पोहोचता कामा नये, याबाबत मी नेहमीच आवाज उठविला आहे. मुले आणि महिला हल्ल्यांची शिकार होता कामा नयेत, या मताचा मी आहे, अशी पोस्ट देखील त्यांनी एक्सवर टाकली आहे.
Related
Articles
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी